नेवासा.
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रद्धा जायगुडे इयत्ता बारावी कॉमर्स च्या शाखेत पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे. श्रद्धा जायगुडे यांच्या यशाबद्दल श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे सत्कार करून गौरव उदगार सर्व शिक्षक व प्राचार्य यांनी करून त्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल कु. जायगुडे यांना त्यांचे आई-वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले . श्रद्धा जायगुडे या नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध व्यवसायिक निवृत्ती जायगुडे-पाटील यांच्या कन्या आहे. या यशाबद्दल बोलताना निवृत्ती जायगुडे पाटील म्हणाले की माझ्या मुलीची अभ्यासू वृत्ती व कौशल्यामुळे तिला हे यश प्राप्त झाले आहे. ती नक्कीच एक मोठी अधिकारी होऊन समाजात काही तरी करून दाखवील व समाज घडवेल व आपले आई बाबा चे नाव नक्कीच रोशन करेल.