नेवासा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन करून अंमलबजावणी सुरू करा या मागणीसाठी विविध संघटनांकडून तहसीलदार व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन .

नेवासा.
 शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी, शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणीं, शेतीपूरक व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, बियाणे, खत याबाबत शेतकऱ्यांना  मार्गदर्शन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कृषी विकास समितीची स्थापना करण्याबाबत दि 9 सप्टेंबर 2020 रोजी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासननिर्णय घेण्यात आला असून या शासननिर्णयाची अंमलबजावणी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी अजूनही केलेली नसल्यामुळे या शासननिर्णयानुसार नेवासा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तातडीने ग्राम कृषी विकास समितीची स्थापना व्हावी यासाठी तहसीलदार साहेब, नेवासा आणि गट विकास अधिकारी साहेब नेवासा यांना गुरुवार दिनांक 5/5/2022 रोजी  निवेदन देण्यात आलेले आहे. सदरचे निवेदन देताना शेतकरी संघटनेबरोबर नेवासा तालुक्यातील इतर सामाजिक संघटनां आणि सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
शेतकरी संघटनेकडून श्री.त्रिंबक भदगले  गोरक्षनाथ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली सुनील फडे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री प्रताप भाऊ चिंधे, भाजप प्रसिद्धीप्रमुख श्रीआदिनाथ पटारे, किरण जावळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिराताई गुंजाळ, मुक्ताबाई साळुंके, मनसे तालुका अध्यक्ष श्री दिगंबर पवार, सोपान रावडे सामाजिक कार्यकर्ते, संभाजी माळवदे( काँग्रेस तालुकाध्यक्ष), भाऊसाहेब झिने(भा.ब.प. बहुजन महासंघ आदिवासी सेना), संभाजी ब्रिगेड चे वैभव दिवटे, निलेश लवांडे, उमेश ताकटे, सुरेशराव शेटे(जिल्ह्याधयक्ष, शिवसंग्राम संघटना) हे उपस्थित होते. या निवेदनाची शासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.