नेवासा फाटा येथे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते विठूचा वारकरी मिसळ ब्रँड चे उद्घाघाटन झाले.

नेवासा फाटा मुकिंदपुर)
1 मे 2022 रोजी 'महाराष्ट्र दिन' व 'कामगार दिन' चे निमित्त साधुन 'विठूचा वारकरी झणझणीत मिसळ अन बरचं काही ...'या मराठी तरूणांचा 'मिसळ'मधला 'मराठी ब्रँड' चे उद्घाटन  'मराठी ह्रदयसम्राट' मा.श्री. 'राजसाहेब ठाकरे'यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळा साठी मराठी सिनेअभिनेते श्री‌. अंकुशजी चौधरी सर, मा. श्री. अमित साहेब ठाकरे,मा.श्री. बाळा नांदगावकरजी  साहेब, चिञपट निर्माते श्री. केदारजी शिंदे आवर्जून उपस्थित होते.आपले मनोगत  व्यक्त करताना  'मराठी तरुणांसाठी आपल्या फ्रॅंचाईजी चा   कसा उपयोग होईल?' या कडे राज साहेबांनी लक्ष वेधले.'मराठी तरुणांसाठी काहीतरी  करा' असा आपुलकीचा सल्ला दिला आणी पुढील फ्रॅंचाईजी सुरु  होण्यासाठी आशीर्वाद दिले.'आपण दिलेल्या वडिलकीच्या सल्ला च आम्ही तंतोतत पालन करू व पुढील वाटचाल करू'असे आश्वासन 'विठूचा वारकरी' चे संचालक  श्री मयुरजी गोल्हार यांनी दिले.कार्यक्रम चे सुञ संचालन श्री कुशलजी दरवडे यानी केले तर श्री निखीलजी खेडकर यांनी आभार मानले 'विठूचा वारकरी' परीवारा तर्फे श्री रामदासजी गोल्हार साहेब यांनी मान्यवरांचे सत्कार केले.कार्य क्रमानंतर 'विठूचा वारकरी' च्या  झणझणीत मिसळ व चहाचा आस्वाद घेउन  मान्यवर पुढील प्रवासास रवाना झाले .सदर कार्य क्रमाचे आयोजन श्री अक्षय गोल्हार ,  श्री योगेश राऊत , श्री सुनिल गवळी , श्री ज्ञानेश्वर मुंगसे यांनी केले. सदर कार्यक्रम हाॅटेल साईदर्शन ईन नेवासा फाटा जि अहमदनगर येथे पार पडला.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.