माळीचिंचोरा.
माळीचिंचोरा फाटा येथे दिवसेंदिवस वाढत्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी माळीचिंचोरा चे जागृक माजी सरपंच प्रकाश वाघमारे यांनी नुकताच ग्रामपंचायत माळीचिंचोरा यांच्याकडे माळीचिंचोरा फाटा नगर औरंगाबाद हायवे वर ट्राफिक सिग्नल ब्लींकर बसवण्याच्या मागणीचे निवेदन माळीचिंचोरा ग्रामपंचायतीला दिले आहे अनेक युवक व आसपासच्या गावातील रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे माळीचिंचोरा फाटा चौक हे जास्त गजबजलेले नसल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक जणांचा बळी गेला आहे वेळोवेळी हायवे वर अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे याला आळा बसण्यासाठी माळीचिंचोरा चे माजी सरपंच प्रकाश वाघमारे यांनी ग्रामपंचायत ने आपल्या निधीतून ट्राफिक सिग्नल ब्लींकर बसविण्याची मागणी केली आहे.