नेवासा फाटा( मुकिंदपुर)
आज दिनांक 1मे 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा कॉलनी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे श63वा महाराष्ट्रदिन अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निकम मॅडम व शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती घाडगे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ प्रमिलाताई वारे उपस्थित होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त कु. प्रणिता कुंभार व.चि श्रीराज कुंभार यांनी भाषण केले. तर चि.प्रत्युष वनवे याने गीत गायन केले. सन 2021- 22 या कोरोना कालावधीत ज्या ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानिमित्ताने श्रीमती बनकर मॅडम, अवचरे मॅडम, गायकवाड मॅडम व बुचुडे मॅडम यांच्यातर्फे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. मुलांना आज निकालपत्रकांचे वाटप करण्यात आले. निकाल पाहून पालक व विद्यार्थी आनंदित झाले. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्रीमती निकम मॅडम, श्री. जाधव सर, पदवीधर शिक्षक बर्डे सर व श्री. वनवे सर, श्री सोनकांबळे सर, श्रीम. अवचरे मॅडम, श्रीम. बनकर मॅडम, श्रीम. गायकवाड मॅडम व श्रीम. बुचुडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वनवे सर यांनी केथले.