नेवासा फाटा( मुकिंदपूर.)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा कॉलनी नेवासा फाटा मुकिंदपूर येथे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल लक्ष्मण निकम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रमिलाताई वारे होत्या. या कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुलोचनाताई पटारे मॅडम या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे मुकिंदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. गणेश माटे, नेवासा खुर्द बीटच्या विस्तारअधिकारी श्रीम. पद्मा येणारे मॅडम, खरवंडी बीट चे विस्तारअधिकारी श्री. जगन्नाथ नजन सर केंद्रप्रमुख श्रीमती केदारे मॅडम, त्याचप्रमाणे कडा कॉलनी शाळेच्या माजी शिक्षिका श्रीम. घाडगे मॅडम, गुरुकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. भास्कर नरसाळे, शिक्षक नेते जंगले सर, अहमदनगर प्राथ. शिक्षक बँकेचे संचालक श्री. राजूभाऊ मुंगसे, गुरुमाऊली मंडळाचे तालुका अध्यक्ष श्री.दशरथ ढोले पंचायत समिती अर्थ विभागाचे श्री. बन्सी भाऊ आगळे, नेवासा तालुका शिवसेना शहर प्रमुख श्री नितीन जगताप, श्री. महेश निपुंगे, पत्रकार श्री.सुरेंद्र परदेशी, मुख्याध्यापक श्री जगताप सर, कडू पाटील सर, श्री कांबळे सर,अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री राजगिरे सर, शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच प्रमाणेशिक्षक श्री.सरोदे सर, श्री.शाम फंड सर, श्री फाजगे सर, श्री.घोडके सर, वाखुरे सर, मोरे सर मुख्याध्यापिका श्रीम. जोशी मॅडम, गवळी मॅडम, खान मॅडम शिक्षिका श्रीमती कर्जुले मॅडम, डमाळे मॅडम, गवळी मॅडम, शिर्के मॅडम, जाधव मॅडम, कराड मॅडम, कमलापुरकर मॅडम, मूलकुलवार मॅडम शिदोरे मॅडम, काकडे मॅडम,बोरावके मॅडम, खंदारे मॅडम, लोंढे मॅडम यांच्यासह नेवासा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी पटारे मॅडम, श्री भास्कर नरसाळे सर, श्री. मुंगसे सर, श्री.जगताप सर, त्याचप्रमाणे श्रीमती कर्जुले मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे, बादल परदेशी यांनी मनोगत व्यक्त करून मुख्याध्यापिका विमल लक्ष्मण निकम यांनी अनेक विद्यार्थी घडवून आपल्या देशाची सेवा केली व सुसंस्कृत पिढी घडवून अनेकांना दिशा देण्याचे काम केले आज विविध क्षेत्रात त्यांनी घडविलेले विद्यार्थी कार्य करीत आहे मी देखील त्यांच्या हाताखाली शिकलो आहे असे बादल परदेशी म्हणाले व ,या पुढे श्रीमती निकम मॅडम यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. आजच्या सेवापुर्ती कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती श्रीमती निकम मॅडम व श्री कुऱ्हे सर यांचा शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री. जाधव सर, पदवीधर शिक्षक बर्डे सर व श्री. वनवे सर, श्री सोनकांबळे सर, श्रीम. अवचरे मॅडम, श्रीम. बनकर मॅडम, श्रीम. गायकवाड मॅडम व श्रीम. बुचुडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अवचरे मॅडम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वनवे सर व बनकर मॅडम यांनी केले. आभार श्री. बर्डे सर यांनी मानले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.)