नेवासा : पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारचा शिवसेनेच्या वतीने नेवासा येथे निषेध नोंदविण्यात आला. रविवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शहरात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे,युवासेनेचे सहसचिव सुनील तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलनकरण्यात आले. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख निरज नांगरे, शिवसेना
शहरप्रमुख नितीन जगताप यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम उगले, युवासेना तालुकाप्रमुख कैलास लष्करे, युवासेना शहरप्रमुख
महेश गरुटे, मुळा साखर कारखान्याचेसंचालक शिवाजी जंगले यांच्यासह अंबादास लष्करे, सुनील धायजे, युसूफ
बागवान, साईनाथ लष्करे, शिवाजी लष्करे, राजू लष्करे, धनू काशीद, बंटी वाघ, आकाश कडू, नितीनलष्करे,महेश भुसारी, कार्तिक पिटेकर, अंकुश बंदीवान, आकाश दिवटे, काकासाहेब खंडागळे, संतोष मोरे यांच्यासह
शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.