अहमदनगर येथे 11 एप्रिलला बॉडी बिल्डिंग स्पर्धा

नगर - अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग
अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्यावतीने व महाराष्ट्र
बॉडी बिल्डिर्स असोसिएशनच्या मान्यतेने ११
एप्रिल रोजी निलक्रांती चौक येथे बॉडी बिल्डिंग
स्पर्धेचे अजय साळवे मित्र मंडळाच्यावतीने
आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५५
किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५
किलो व ७५ किलो वरील अशा सहा वजन गटात
होणार आहे. यातील प्रत्येक गटातील विजेत्या पाच
खेळाडूस आकर्षक ट्रॉफी, सर्टिफिकिटस्, रोख
रक्कम, मेडल, बॅग देण्यात येणार आहे. टायटल
विजेत्यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम, मानाचा
बेल्ट देण्यात येईल. तसेच बेस्ट फिजिक ही
स्पर्धाही होईल.स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश सातपुते, जावेद
सय्यद, विक्रम भोगाडे, नितीन पारखे, विश्रांती
आढाव मॅडम, प्रविण घावरी, हनिफ शेख, दत्ता
रणसिंग, सोहेल शेख, जावळे, नाना घोरपडे, महेश
गोसावी, केतन नवले, जेम्स ससाणे, तौसिफ
शेख, शाह मन्सूर सुभेदार, केतन देशमुख, भैय्या
बॉडी बिल्डर, इम्रान शेख, माजीद तांबटकर,
मजहर तांबटकर, संजय सुरवसे, मयुर फलके,
सागर येवले, संतोष गायकवाड आदि प्रयत्नशिल
असल्याचे असोसिएशनचे सेक्रेटरी जयंत गिते
यांनी सांगितले.
आयोजकांच्यावतीने खेळाडूंच्या जेवणाची
सोय केली आहे. स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे,
असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.