स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी व अधिकारी व पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सापळा लावून धरला ऋषिकेश शेटे.
कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांचे पी.ए राहुल राजळे यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी विकास जनार्दन राजळे यांच्या फिर्यादीवरून दिलेल्या माहिती अनुसार फरार असलेला आरोपी ऋषिकेश शेटे व शंकरराव गडाख व त्यांचे सुपूत्र उदयन गडाख यांना जीवे ठार मारण्यासाठी २० पिस्टल आणून ठेवल्या असून, आम्ही फक्त वाट पाहून आहोत. घरात जाऊन ठोकून टाकू, व अशा आशयाची क्लिपमध्ये संभाषण करणारा ऋषिकेश शेटे यास मोठ्या शिताफीने पकडण्यात आले आहे .ही संभाषण क्लिप सध्या सोशल मीडियातून व्हायरल झाल्यामुळे मंत्री गडाख
समर्थकांसह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.याचा निषेध करण्यासाठी व फरार आरोपींचा
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे ऋषीकेश शेटे हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. नमुद फरार आरोपीचा
पोनि/ श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असतांना पोनि/ श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी नामे ऋषीकेश शेटे हा त्याचे राहते घरी हनुमानवाडी, ता. नेवासा येथे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, सपोनि/गणेश इंगळे, पोसई / सोपान गोरे, सफी / भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर
गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना / ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकों / सागर ससाणे, रोहित येमुल,रणजीत जाधव व चापाहेको/ उमाकांत गावडे व अर्जुन बडे अशांनी मिळुन हनुमानवाडी, ता. नेवासा येथे जावुन आरोपीचे घराचे आजुबाजूस सापळा लावुन आरोपी नामे ऋषीकेश शेटे यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव ऋषीकेश वसंत शेटे, वय ३०, रा. हनुमानवाडी, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले
त्यास नमुद गुन्द्या बाबत चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता सोनई पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.नमुद गुन्ह्याचा तपास श्री. सुदर्शन मुंडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचेकडे असुन त्यांचे कार्यालयातील पोनि/ श्री. विजय क-हे यांनी गुन्ह्याचे तपासात व आरोपी अटकेमध्ये सहकार्य केले.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम,
अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. सुदर्शन मुंढे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.