नेवासा तालुक्यातील कुकाणा शिवारात वीज वितरण कंपनीचे रोहित्र खाली पाडून त्यातील अॅल्युमिनियम क्वॉईल व ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत महावितरणच्या
लाईनमनने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ब्राह्मण म्हरु पवार देवसडे ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, कुकाणा ते देवगाव जाणाऱ्या रोडलगत कुकाणा
शिवारात ३० मार्च सकाळी ९ वाजण्याच्या पूर्वी कुकाणा ते देवगाव रोडवर कुकाणा शिवारात वीज वितरण कंपनीच्या विजेच्या खांबावरील रोहित्र खाली पाडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोहित्रातील २४ हजार
४०० रुपये किंमतीची ८० किलो वजनाची अॅल्युमिनीयम कॉईल व ऑईल स्वतःच्या फायद्यासाठी चोरुन नेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा रजिस्टर नंबर २७१/२०२२ भारतीय
दंड विधान कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक बी. आर. कोळपे करत आहेत.