पारनेर तालुक्यातील
कामटवाडी येथील बाबाजीतुकाराम मोरे या वूद्धाच्या घरी य दि.११ जून २०२१ रोजी दुपारी
५ अनोळखी इसम हातात चाकू, लाकडी दांडके घेवून घुसले व -त्यांनी दरोडा टाकत सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले
होते.या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात दरोड्याचा
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक मनोज
पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या दरोड्याचा
छडा लावण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्याचा समांतर
तपास करत असताना सदर गुन्हा मिलन उर्फ मिलिंद
ईश्वर भोसले (रा. बेलगाव ता.कर्जत हल्ली रा. वनकुटे
शिवार, ता. पारनेर) याने केल्याची माहिती मिळाली.
एलसीबीच्या पथकाने त्यास ताब्यात घेतल्यावर त्याने
सदर गुन्हा संदीप ईश्वर भोसले, मटक ईश्वर भोसले,
पल्या ईश्वर भोसले, अतुल ईश्वर भोसले यांनी मिळून
केल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या टोळीवर मोक्कालावण्यात आला होता.
पोलिस ३ दिवस कामगारांच्या
वेशात राहिले दगड खाणीवर मुक्कामी
घटनेनंतर सर्वजण फरार झाले होते. यातील
संदीप ईश्वय भोसले याची महाराष्ट्रातील गुन्हेगारी
विश्वातील कुविख्यात अशी ओळख असून तो रत्नागिरी
जिल्ह्यात चांदोर येथे लाल दगडाच्या खाणीत विजय
नारायण भोसले (रा. वाहिरा, ता.आष्टी) या नावाने मजूर
म्हणून काम करत असल्याची माहिती पो.नि.अनिल
कटके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे
पो.नि. कटके यांनी एक पथक रत्नागिरीला पाठवले.
| पोलिसांनी संदीप भोसलेला पकडण्यासाठी तीन दिवस
सापळा लावला होता. त्यासाठीलाल दगडाच्या खाणीवर वाहनचालक, मजूर काम करणाऱ्यांचा वेष परिधान करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ३ दिवस खाणीवर३ इतर कामगारांबरोबर मुक्कामी
राहून काम केले. त्याच्या मागावर राहन त्याचे राहते ठिकाण याची माहिती घेतली. त्यानंतर पहाटेच त्याच्या घरावर छापा मारला.पोलिसांची चाहूल लागताच त्याने
पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तीन किलोमीटर पाठलाग करत- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
अखेर त्याला जेरबंद केले.संदीप ईश्वया भोसल याला
सहा बायका असून सुमारे पंचवीस मुलं मुली असा त्याचा
संसार आहे अनेक वर्षांपासून तो फरार होता काही
दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला
पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो पळून जाण्याचा
यशस्वी झाला होता.
सादर कामगिरी जिल्हापोलिस अधीक्षक मनोज
पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक अनिल कटके सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ
सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, पोकॉ सागर
ससाणे व रणजीत जाधव यांनी केली आहे.