सोनई.
जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांना शुक्रवारी रात्री लोहगाव येथे पिस्तुलातून गोळ्या मारून जखमी केले होते या घटनेतील चार आरोपी लगेच पसार झाले होते.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या
मार्गदर्शनाखाली चार पथके तयार केली आहेत ही पथके पसार आरोपींच्या मागावर आहेत आरोपींपैकी एक आरोपी शेवगाव मधून गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी संध्याकाळी पकडून सोनई पोलिसांच्या ताब्यात दिले सोनई पोलिसांनी शिरसाठ न्यायालयात हजर केले असता त्यास 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीमध्ये अजून काही शिरसाठ यांच्या कडून माहिती मिळण्याची शक्यता आहे यामागे या प्रकरणामागे आणखीन कोण कोण मास्टर माईंड आहे या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.