नेवासा( म्हसले ).
नेवासा तालुक्यातील म्हसले येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीमध्ये नामदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वातील उमेदवारांनी बाजी मारली. विजयी उमेदवार संभाजी पुंजाराम शिरसाठ, बाबुराव ज्ञानदेव शिरसाट, बाबासाहेब दादा गव्हाणे, आसाराम शिवाजी गव्हाणे, पांडुरंग काणु पवार, रायभान नाना गव्हाणे, रामेश्वर सखाराम शिरसाठ, छबुराव नाना वाघमारे, कमल पांडुरंग शिरसाट, छानदेव नामदेव नवाळे, भीमराज काकिरा मोरे, छाया शरद शिरसाट ,शहादेव बाबूराव गव्हाणे, यांचे म्हसले येथील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला, गुलालाची उधळण करून विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी संस्थापक बाळासाहेब देवराव शिरसाट माजी चेअरमन, बाळासाहेब आसाराम शिरसाट चेअरमन ,पंढरीनाथ गोविंद गव्हाणे वाईस चेअरमन ,सरपंच दत्तात्रय नामदेव शिरसाट, निवृत्ती पवार, शिवाजी दशरथ शिरसाट, सोपान एकनाथ गव्हाणे, संभाजी रोहिदास गव्हाणे, बाबासाहेब गणपत शिरसाट, आदी व्यक्तींनी निवडणूक प्रसंगी सहकार्य केले व निवडून आल्यानंतर जल्लोष व्यक्त केला