नेवासा फाटा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा कॉलनी येथे शाळापूर्व तयारी विद्यार्थी बाल गोपाळ मेळावा आनंदात साजरा.

नेवासा फाटा (मुकिंदपुर)
दि.19/4/2022
संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल गोपाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम जिल्हा परिषद शाळेमध्ये राबविण्यात येत आहे आज नेवासा फाटा मुकिंदपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा कॉलनी येथे बाल गोपाल आनंद मेळाव्याचे आयोजन सर्व पालक वर्ग व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये आनंद मेळावा पार पाडण्यात आला.या मेळाव्याची सुरुवात लेझीम खेळून विद्यार्थ्यांनी उपस्थित पालक वर्ग यांचे स्वागत केले या आनंद मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री वनवे सर यांनी केले. आनंद मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुकिंदपुर चे नवनियुक्त उपसरपंच गणेश माटे व नेवासा खुर्द चे केंद्रप्रमुख जगताप सर हे उपस्थित होते या
कार्यक्रम प्रसंगी श्री जगताप सर म्हणाले की विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या अगोदर शाळेचे आवड निर्माण व्हावी यासाठी हा मेळावा घेण्यात आला आहे ,तरी जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थ्यांचे शाळेत ऍडमिशन लवकरात लवकर करावा. व समाजात विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहेत कोणी प्रशासकीय अधिकारी ,तर कोणी इतर क्षेत्रात काम करणार आहेत या विद्यार्थ्यांना प्रकाशात आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, असे मार्गदर्शन श्री जगताप सर यांनी केले  श्री वनवे सर यांनी 13 जून रोजी शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे ऍडमिशन चालू होणार आहे तरी सर्व संबंधित कागदपत्र घेऊन शाळा व्यवस्थापन जमा करण्याचे आवाहन केले तसेच या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व पालक व विद्यार्थ्यांचे पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुकिंदपुर चे उपसरपंच श्री गणेश माटे यांनी सर्व शिक्षक शिक्षिका पालक व, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आभार मानले.या कार्यक्रम प्रसंगी सुनील सवई, मुख्याध्यापिका निकम मॅडम , बुचूडे मॅडम, डमाळे मॅडम, बर्डे सर ,श्री. सोनकांबळे सर श्री. जाधव सर श्रीम. बनकर मॅडम श्रीम अवचरे  मॅडम सर्व पालक वर्ग तसेच ,विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.