नेवासा फाटा.
नेवासा फाटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नामदार शंकराव गडाख यांचे समर्थक शेकडोंच्या संख्येने उन्हाच्या तीव्रतेमध्ये मध्ये त्यांची आतुरतेने वाट पाहत होते .नामदार शंकरराव गडाख यांचे स्वागत नेवासा फाटा मुकिंदपूर चे लोकनियुक्त सरपंच दादा निपुंगे व राजूभाऊ उंदरे पाटील व सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी केले. यावेळी नामदार शंकरराव गडाख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हात जोडून अभिवादन केले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष गणपतराव मोरे, भास्कर मामा लिहीणार, पोलीस पाटील आदेश साठे
यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते व नामदार शंकरराव गडाख पाटील यांचे आभार मानले यावेळी नेवासा फाटा मुकिंदपूर चे माजी उपसरपंच अरुण आप्पा निपुंगे, माऊली देवकाते, नीलेश निपुंगे ,गजानन बापू पवार, निवृत्ती जायगुडे-पाटील, अनिल भैय्या डावकर, विजू कांबळे ,पत्रकार ज्ञानेश सिन्नरकर ,वसंत पाटील वांडेकर, बबलू साळवे ,आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेवासा फाटा( काळेगाव मुकिंदापूर).
काळेगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महंत सुनील गिरी महाराज यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन साजरी करण्यात आली यावेळेस सुनील गिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून जनसामान्यात विकसित करून विविध प्रशासकीय सेवेत काम करून खरी मानवंदना देण्यात येईल असे उद्गागार सुनील गिरी महाराज यांनी उपस्थितांना केले.
गणपतराव मोरे साहेब व पोलीस पाटील आदेश साटे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पोलीस पाटील आदेश साठे म्हणाले कि काळेगाव च्या तरुणांनी डी.जे न लावता व्यर्थ खर्चाला आळा घालून, सभामंडप सुधारणा व अन्नदानाचा चांगले नियोजन केले ,याचे त्यांनी कौतुक केले या कार्यक्रम प्रसंगी माऊली भाऊ देवकाते प्रवीण साठे उत्तम विटकर रामू धनवटे राजू इंगळे लोकनियुक्त सरपंच दादा पाटील निपुंगे भास्कर मामा लिहिणार यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.