दि-०९.०४.२०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास रामनवमी मिरवणुकी दरम्यान काही
सामाज कंटकांनी जातिय तणाव निर्माण करुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला होता
त्यावरुन पोहेकॉ/१०४ टी बि गिते यांचे फिर्यादी वरुन नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मा पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो, अहमदनगर,
मा अपर पोलीस अधिक्षक सो सौरभ अग्रवाल सो, अहमदनगर, मा अपर पोलीस अधिक्षक सो
स्वाती भोर मॅडम, श्रीरामपुर, मा उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे सो शेवगाव यांनी
तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देवुन सुचना दिल्या होत्या. आरोपी शोधकामी तपासपथके
तयार करुन आरोपीतांचा शोध घेत असतांना 1) शेख रेहान अरिफ वय-22 वर्षे 2) शेख फजल
युसुफ वय-22 वर्षे 3) शेख इम्रान जमिर वय-27 वर्षे 4) शेख सद्दाम जमीर वय-24 वर्षे 5) शेख
सलमान जमीर वय-20 वर्षे 6) शेख उर्फ जहागिरदार सोहेल युसुफ वय-22 वर्षे 7) मुसा याकुब
बागवान वय-50 वर्षे 8) सलमान मुसा बागवान वय-24 वर्षे सर्व रा-नाईवाडी गल्ली नेवासा खु
ता-नेवासा आरोपीतांना यांना अटक करण्यात आली आहे.
नेवासा पोलिसांकडून नेवासकर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कि कोणत्याही अफवांवर
विश्वास ठेवु नये तसेच असे कोणी समाज विघातक काम करत असल्यास पोलीसांशी संपर्क करावा.
सदरची कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो, अहमदनगर, मा अपर पोलीस
अधिक्षक सो सौरभ अग्रवाल सो, अहमदनगर, मा अपर पोलीस अधिक्षक सो स्वाती भोर मॅडम,
श्रीरामपुर, मा उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे सो शेवगाव यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक बाजीराव एम पोवार तसेच पोलीस स्टाप यांनी केली आहे.