नेवासा फाटा (मुकिंदपुर) कडकडीत बंद. मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांकडून.

नेवासा फाटा (मुकिंदपुर).
अहमदनगर - राज्याचे जलसंधारण मंत्री यांचे पी.ए राहुल राजळे  यांच्यावर मागच्या आठवडयात
गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे ठार मारण्यासाठी कट
रचल्याची ॲडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे.या घटनेतील फरार गुन्हेगारांचा
शोध पोलिसांनी घेऊन दोर्षीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.२७)
नेवासा शहरासह तालुका बंद ठेवण्याचे लेखी निवेदन गडाख समर्थकांनी तहसिलदार रुपेशकुमार
सुराणा व नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना देण्यात आले आहे.


शंकरराव गडाख व त्यांचे सुपूत्र उदयन गडाख यांना जीवे ठार मारण्यासाठी २० पिस्टल आणून
ठेवल्या असून, आम्ही फक्त वाट पाहून आहोत. घरात जाऊन ठोकून टाकू, अशा आशयाची संभाषण क्लिप सध्या सोशल मीडियातून
व्हायरल झाल्यामुळे मंत्री गडाख समर्थकांसह तालुक्यात एकच खळबळ उडाली.याचा निषेध व्यक्त
करण्यासाठी व फरार आरोपींचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी .नेवासा फाटा मुकिंदपुर येथील नामदार शंकरराव गडाख यांचे समर्थक भरत काळे,माऊली देवकाते ,खडू  भाऊ कराडे, संभाजी कराडे ,काणीप कराडे ,अनिल कराडे ,राजू कराडे ,नामदेव कराडे मदन कराडे, वसंत पाटील वांडेकर निवृत्ती पाटील जायगुडे
यांच्यासह मुकिंदपुर नेवासा फाटा येथील सर्व ग्रामस्थ व व्यापारी व्यावसायिकांनी स्वयम् उत्स्फूर्त तिने आपले दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.