नेवासा
पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तीन सराईत मोटारसायकलचोरट्यांकडून१०मोटारसायकलीसह दोन मोबाईल असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा
मुद्देमाल हस्तगत केला. एक फरारआरोपीचा शोध नेवासा पोलिस घेत आहेत. नेवासा पोलिसांनी
मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह अटक केल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
नेवासा येथील राहुल संजय दाणे तसेच अरुण तुकाराम डौले यांच्या मालकीची मोटारसायकल चोरीला गेलेली असल्यामुळे नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आलेला होता.या फिर्यादीवरून मोटारसायकल चोरांचा तपास पोलिस निरीक्षक
बाजीराव पोवार यांनी सुरू केलेला होता.रात्रगस्त घालत असतांना आरोपी ज्ञानेश्वर गणपत शेडुते हा मोटारसायकलवरून1 संशयास्पदरित्या फिरत असताना
गस्तीवरील पोलिसांनी त्याचीचौकशी करून ताब्यात घेतले.सदरील दुचाकी चोरीची असल्याचे नेवासा पोलिसांना निष्पन्न झाले.आरोपी ज्ञानेश्वर शेडुत याला नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली.पोलिस निरीक्षक पोवार यांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी ज्ञानेश्वर शांताराम मोरे ता.श्रीरामपूर),राम रमेश पोटे (रा.घोडेगाव,
ता.नेवासा), लक्ष्मण दिलीप(रा.भोकरआहेर (रा.भोकर ता.श्रीरामपूर)अशी नावे तपासात उघड झाली.
वरील आरोपींकडून चोरी गेलेल्या मोटारसायकलींचा अधिक तपास केला असता त्यांच्याकडून
१० मोटारसायकलीसह दोन मोबाईल जप्त करण्यात आले,आरोपी ज्ञानेश्वर शेडुते, ज्ञानेश्वर मोरे (रा.भोकर ता.श्रीरामपूर),लक्ष्मण दिलीप आहेर (रा.भोकर
.श्रीरामपूर) या तीन आरोपी गजाआड करण्यात यश आले.सदरची कामगीरी ही मा पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो, अहमदनगर, मा अपर पोलीस
अधिक्षक सो सौरभ अग्रवाल सो, अहमदनगर, मा अपर पोलीस अधिक्षक सो स्वाती भोर मॅडम,
श्रीरामपुर, मा उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे सो शेवगाव, मा पोलीस निरीक्षक बाजीराव एम
पोवार यांचे मार्गदर्शना खाली पोसई नितीन पाटील, पोसई समाधान भाटेवाल, सफौ कैलास साळवे, पोहेकॉ
तुळशीराम गिते, पोना अशोक कुदळे, पोना किशोर काळे, पोकॉ अंबादास गिते, केवल रजपुत, सुमित
करंजकर, आप्पासाहेब तांबे, राजेंद्र बिरदवडे चापोकॉ कु-हाडे, चापोकॉ भवार यांनी केली आहे.