कुख्यात गुंड गॅंगस्टर गजा मारणे यांची सुटका

पुणे.
कारागृहातून सुटल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह बेकायदा मिरवणूक
काढून दहशत निर्माण केल्याप्रकरणी 'एमपीडीए' कायद्यांतर्गत एका
वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलेला कुख्यात गुंड
गजानन मारणे याची सुटका करण्यात आली आहे.
तळोजा कारागृहातून
बाहेर आल्यावर मारणे टोळीने बेकायदा जमाव जमवून मुंबई-पुणे
द्रुतगती मार्गावर मिरवणूक काढली; तसेच आरडाओरडा करून दहशत
निर्माण केली. त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते.
या प्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर, पुणे, पिंपरी-चिंचवड
आणि ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर
गजानन मारणे याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याखाली
(एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती त्यानंतर त्यांना आज रोजी सोडण्यात आले असे अॅड. ठोंबरे यांनी
सांगितले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.