नेवासा.
-
नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी कचरू हिरामण गडाख हे बुधवारी सायंकाळी नेवासा-उस्थळ रस्त्यावर मित्रासोबत पायी फिरण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या एका पिकअपने
गडाख यांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कचरु गडाख यांना प्राथमिक उपचारासाठी नेवासा शहरातील येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्यामागे पत्नी, चार भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, तीन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. राम गडाख यांचे ते वडील, दत्तात्रय गडाख
यांचे ते बंधू होत.