नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक परिसरात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, स्टार्टर, मोटार ऑटो, व केबल चोरट्यांचा धुमाकूळ सुरु झाला आहे. शेतकरी संजय लोखंडे यांच्या शेततळ्यावरुन १२ हजार रुपये किमतीचे पीटर इंजिन चोरीला गेले, तसेच शेतकरी दिगंबर झगरे यांच्या शेतातून केबल चोरी करण्यात आली आहे. पोलीस पाटील अशोक पुंड
यांचे स्टार्टर व ऑटो तसेच सत्तार शेख यांची केबल चोरीला गेली आहे.शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये या भुरट्या चोरा मुळे भीती निर्माण झाली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारीच्या केबल चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत.