अहमदनगर.
विषारी औषध घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षात नेमणूकीसअसलेले सोमनाथ बापु कांबळे (रा. विळद ता. नगर) यांनी
जीवन संपविले घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरतालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी औषध घेतले होते.त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांबळे हे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षात नेमणूकीस होते.त्यांनी अनेक हरवलेल्या मुले-मुली, महिला-पुरूष यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. त्यांनी कोणत्या कारणातून विष घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदाराने विष घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस दलात पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे.