नेवासा बसस्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक पर्स रघुजन गॅस एजन्सी मध्ये काम करणाऱ्या रमेश उकिरडे या कामगाराला दिसली. त्यामध्ये दोन मोबाईल, सोन्याचे दागिने आणि काही रोकड अशा स्वरुपात एकूण साडेतीन लाखांचा ऐवज
त्यांला त्यामध्ये दिसला. त्यांनी पर्स बघितली असता नेवासा येथीलअंगणवाडी सेविका मन्नाबी रफिक बागवान यांची ती पर्स असल्याचे त्याला समजले. रमेश यांनी नेवासा येथील डॉ. बागवान यांच्याशी संपर्क
साधून सापडलेला ऐवज त्यांच्याकडे परत केला. मन्नाबी बागवान यांनी रमेश उकिरडे यांच्या प्रामाणिकपणाचा नम्रपणे कौतूक करत पेढा भरून आभार व्यक्त केले