औरंगाबाद : तुझ्या वाहनाने माझा अपघात
केला आहे असे म्हणत दोघांनी वकिलाला
मारहाण करत लोखंडी कड्याने डोके फोडले.
ही घटना २९ मार्चला सायंकाळी पावणेसहाच्या
सुमारास तापडिया नाट्यगृहासमोर घडली
संतोष काशिनाथ मिमरोट (३४, रा. संजयनगर,
मुकुंदवाडी गल्ली क्र. ३) हे दुचाकीने घराकडे
जात होते. निराला बाजार भागातील तापडिया
नाट्यगृहासमोर येताच दुचाकीवर (एमएच-
२०-सीक्यू-९५५७) आलेल्या अज्ञात दोघांनी
संतोषला तुझा वाहनामुळे माझा अपघात
झाला असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली.
तसेच एकाने हातातील लोखंडी कडे संतोषच्या
डोक्यात मारले. यात संतोषचे डोके फुटल्याने
तीन टाके पडले आहेत. याप्रकरणी क्रांती चौक
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.