नेवासा
नेवासा बुद्रुक येथील श्री विश्वेश्वर नाथबाबा मंदिरासाठी विकास कामाच्या दृष्टीने नेवासा बुद्रुक येथील शिंदे परीवाराकडून ७५,००० हजाराची देणगी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांकडे सुपूर्त करण्यात आली.
कै.लक्ष्मीबाई कुटे व कै.चंद्रभागा शिंदे यांच्या स्मरणार्थ संतसेवक बाळासाहेब शिंदे व संतसेवक दत्तात्रय शिंदे यांनी या देणगीसाठी पुढाकार घेतला आहे.विश्वेश्वर नाथबाबा यांच्या पुण्यतिथी सोहळयाचे औचित्य साधून सदरचा निधी शिंदे परिवाराच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रवरानदी तीरी असलेल्या विश्वेश्वर श्री नाथबाबा यांच्या समाधी मंदिर परिसरात गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विविध विकासकामे झालेली आहे.ज्ञानेश्वर जायगुडे व विश्वस्त मंडळाने मंदिर परिसर सुशोभित केला असून अनेक सुविधा येथे उपलब्ध केलेल्या आहेत या सर्व विकास कामांसाठी गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
पंच्याहत्तर हजाराचा निधी दिल्या बद्दल गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांच्या हस्ते दाते बाळासाहेब शिंदे व दत्तात्रय शिंदे यांचा श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला.