विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक पूर्व जामीन मंजूर.

अहमदनगर - पारनेर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३४१, ३५४, ३२७, ५०४,५०६ या कलमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीस अहमदनगर येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात अटकपूर्व जामिन नुकताच मंजूर केला आहे.सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत मौजे पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील आरोपी युवकाचे विरुध्द माहे मार्च २०२२ मध्ये एका फिर्यादी महिलेने पारनेर पोलीस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीमध्ये आरोपीने फिर्यादी महिलेचा रस्ता अडवून तिला शिवीगाळ केली, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला व फिर्यादी महिलेच्या गळ्यातील
मंगळसूत्र घेऊन गेला, त्यानंतर फिर्यादी महिला आरोपीशी न बोलल्यास तिचे फोटो व्हायरल करीन अशी धमकी आरोपीने दिली, अशा स्वरुपाची तक्रार फिर्यादी महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्याप्रमाणे सदर आरोपीचे विरुध्द भा.दं.वि. कलम ३४१,
३५४, ३२७, ५०४, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिन मिळणेकरीता अहमदनगर येथील सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. सदर जामिन अर्जाची नुकतीच सुनावणी झाली. आरोपीच्या वकीलांनी
सदरचा गुन्हा खोटा असल्याचा युक्तीवाद केला.आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. सत्र न्यायालयाने दि. १५/०३/२०२२ रोजी आरोपीस अटी व शर्तीवर अटकपूर्व जामिन मंजूर केलेला आहे.
आरोपीच्या वतीने अॅड. प्रशांत मोरे व अॅड. गणेश कावरे यांनी कामकाज पाहिले.त्यांना अॅड. देवा थोरवे व अॅड. स्नेहल सरोदे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.