पोटखराबा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्याचे वाटप नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते

           

नेवासा.( प्रतिनिधी) .नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा विषयाचा प्रश्न होता गेल्या तीन महिन्यापूर्वी याबाबतीत नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ना शंकरराव गडाख निवेदन दिले होते त्यावर कार्यवाही करून हा प्रश्न व्यक्तिगत लक्ष घालून सोडविणार असल्याचा शब्द ना गडाख यांनी  बैठक घेऊन दिला  होता त्यानुसार स्थानिक तलाठी,तहसिलदार, प्रांतअधिकारी यांचे पर्यत स्वतंत्र यंत्रणा नेमून गावा गावातील पोटखराब्याचा प्रश्न असलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करून एकूण 1298 प्रकरणे दाखल केली होती यातील 1000 प्रकरणे मंजूर झाली असून त्यातील 298 प्रकरणे मंजुरीच्या टप्प्यात आहेत मंजूर प्रकरणाच्या आदेशाचे वाटप ना शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांचा शेतजमिनीच्या पोटखराब्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने सोडवला असून पोटखराबा क्षेत्राचा समावेश लागवडीलायक क्षेत्रात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
           उताऱ्यावर पोटखराबा असल्यामुळे त्या क्षेत्राला वर्षानुवर्षे  बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. पिकाचे नुकसान झाल्यास त्याचा विमाही मिळत नव्हता पोटखराब्याचे नोंदीमुळे येणाऱ्या अडचणी आता राहणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.याप्रसंगी बोलतांना ना शंकरराव गडाख म्हणाले अजूनही ज्या शेतकऱ्यांचे पोटखराबा क्षेत्राचे प्रश्न असतील त्यांनी तातडीने यंत्रणेशी संपर्क करावा तो प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.
शेतकरी बांधवांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असून शेतकरी बांधवाना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.असेही गडाख म्हणाले याप्रसंगी वसंतराव डावखर,भाऊसाहेब सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले व ना गडाख यांचे पोटखराबा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन केले.
          याप्रसंगी नेवासा पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे,  बाजार समिती सभापती डॉ. शिवाजीराव  शिंदे,मुळा कारखाना चेअरमन नानासाहेब तुवर,दादासाहेब शेळके जी प सदस्य,अरुण सावंत, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे,दादासाहेब शेळके, नंदकुमार पाटील,कारभारी चेडे,राजेंद्र उंदरे, बंडू मुंगसे,रंगनाथ जंगले,बाळासाहेब पाटील, पांडुरंग निपुंगे,निलेश पाटील, भाऊसाहेब मोटे,गोरक्षनाथ निकम,राहुल मोटे यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होत तसेच नेवासा तहसिलदार रुपेश कुमार सुराणा,प्रांत श्रीनिवास आर्जुन हे उपस्थित होते.








Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.