नेवासा फाटा( प्रतिनिधी.) नेवासा फाटा शिव महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या उत्साहाचं वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी नेवासा फाटा मुंकीदपुर चे युवानते प्रताप राजे हांडे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर कडू पाटील व नेवासा तालुक्याचे शिवसेना नेते पप्पू भाऊ परदेशी यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भाऊ परदेशी व प्रिन्स दरबार मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बादल भाऊ परदेशी त्यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केले.सजलपुर अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन भाऊ मंचरे यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच अनिल भैय्या डावखर यांचा सत्कार सचिन भाऊ परदेशी यांनी केला..