नेवासा( प्रतिनिधी.)आज आज दिनांक 22/02/2022 रोजी अहमदनगर च्या काँग्रेस कमिटी कार्यालयात अहमदनगर जिल्हा कला आणि सांस्कृतिक विभाग [कॉंग्रेस आय] ची बैठक पार पडली या बैठकीस जिल्हयातील विविध क्षेत्रातील कलावंत मोठ्या संख्येने हजर होते. बैठकीत जिल्ह्यातील तळागाळातील सर्व क्षेत्रातील कलावंतांच्या प्रगती व उन्नती साठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी एकमताने मंजुरी मिळालीअसून लवकरच सांस्कृतिक मंत्री अमितजी देशमुख यांना भेटून महाराष्ट्रातील कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच यावेळी कला आणि सांस्कृतिक विभाग अहमदनगर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या श्री तुषार रणनवरे, वरिष्ठ सचिव जिल्हा कमिटी श्री. अनिल रंगनाथ भोसले, नगर तालुका अध्यक्ष, श्री. संदिप उगाई नगर तालुका उपाध्यक्ष अशोक शंकर शिंदे, राहुरी तालुका अध्यक्ष
या सर्व नियुक्त्यांचे नियुक्ती पत्र माननीय श्री संजय भोसले, प्रदेश समन्वयक अनुसूचित अति विभाग काँग्रेस कमिटी, माननीय श्री राजेंद्र वाघमारे, जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, नगर जिल्हा काँग्रेस कमिटी, माननीय श्री रेवननाथ देशमुख अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक विभाग,कला आणि सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर कडू पाटील, या मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. एप्रिल मध्ये अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या कला आणि सांस्कृतिक विभागाचे मार्फत नेवासा येथे जिल्ह्यातील कलाकार आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेण्यात येणार असून, या मेळाव्याला भारताचे माजी संरक्षण मंत्री सुशीलकुमार जी शिंदे, आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि नगर जिल्ह्यातील मंत्री त्याच प्रमाणे कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष वंदनाताई कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष (दक्षिण विभाग) हे ही उपस्थित राहणार असल्याचे कला आणि सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर कडू पाटील यांनी बोलताना सांगितले.