राहुरी तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांचा फेरलिलाव गुरुवार दि. ३ मार्च तहसिल आवारात करण्यात येणार असल्याची माहिती राहुरीचे तहसिलदार शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
गौण खनिज उत्खनन करताना जप्त केलेल्या व तहसिल आवारात पडून असलेल्या दंडात्मक कारवाई झालेल्या वाहनांना त्यांच्या मालकाकडून दंड भरण्यात आला नाही.त्यामुळेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या मुल्यांकना नुसार त्या वाहनांच्या लिलावास उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंजूरी दिली होती.
२१ जानेवारी रोजी तहसिल कार्यालयात ५९ वाहनांचा लिलाव करण्यात
आला होता. त्यापैकी ४७ वाहनांवर बोली लावण्यात आली होती.राहिलेल्या ११ वाहनांची २५ टक्के रक्कम त्याच दिवशी भरलेली होती.परंतु सर्वोच्च बोली लावूनही उर्वरित ७५ टक्के रक्कम भरली गेली नसल्याने त्या ११ वाहनांचा फेरलिलाव करण्यात येणार आहे.या लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अर्ज, लिलाव होणार या मालमत्तेची हातची रक्कम, अनामत रक्कम, अर्टी व शर्ती त्यासाठी तहसिलदार राहुरी यांच्याशी कार्यालयीन वेळेस संपर्क साधावा. असे आवाहन तहसिलदार एफ आर शेख यांनी केले आहे.
.