नेवासा( प्रतिनिधी.) नेवासा फाटा येथे समर्पण पोलीस भरती, सैन्य भरती, पूर्व प्रशिक्षण अकॅडमी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळेस शिवरायांचे मूर्तीचे पूजन करून अकॅडमी चे संस्थापक विकास शेलार सर व वाखूरे मेजर याच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी रोहित सर यांनी प्रास्ताविक करून शिवरायांच्या कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली . याप्रसंगी अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी शिवरायांचे स्वराज्य निर्मितीचे शौर्य पराक्रमावर भाषण केली.