नेवासा.
कर्नाटक येथिल बजरंग दलचा कार्यकर्ता हर्षा या युवकांची हत्या करण्यात आली त्यामुळे विश्व हिंदू परिषद बजरंगदल नेवासा तालुका याच्यावतीने पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयास निवेदन देण्यात आले यावेळी विविध हिंदुत्ववादि संघटनेचे व पक्षाचे युवक ऊपस्थित होते.
कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्यच आहे. ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे. अशी आमची स्पष्ट धारणा आहे. पाँपुलर फ्रंट आँफ इंडिया ,कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमाँक्रँटिक पार्टी आँफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे.
भारतात घडलेल्या 1946 च्या डायरेक्ट अँक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी अशी शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदू परिषद या निवेदनाद्वारे मागणी करीत आहे.
सिमीचेच दुसरे रुप असलेल्या पाँपुलर फ्रंट आँफ इंडिया ,कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमाँक्रँटिक पार्टी आँफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी आणि त्यांचा पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे.कायदा कायद्याचे काम करेलच परंतु यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार करुन सुधरावे ही अपेक्षा आम्ही यानिमित्ताने करतो आहोत.पाँपुलर फ्रंट आँफ इंडिया ,कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमाँक्रँटिक पार्टी आँफ इंडियाया संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेले आहेत त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल. असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल करीत आहे. यावेळेस निवेदन देतांना प्रशांत बहिरट, संतोष कुटे ,श्रीकांत नळकांडे ,राजु ऊपाध्ये, प्रताप चिंधे, विजय राजपुत ,सुरेश राजपुत ,विलास बोरुडे ,मनोज पारखे ,दिगबर पवार ,पिंपळे अबादास ,ऊदरे विकास लष्करे ,सार्थक परदेशी ,शेडें नाना, प्रतीक शेजुळ ,स्वपनिल मापारी ,मनोज हापसे ,भिष्मा रोठे, गणेश मुरदारे ,शेडे निलेश ,अदित्य चव्हाण ,अदिनाथ पटारे, कृष्णा डहाळे व अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व हिंदू विचार प्रेमी उपस्थित होते.