पारनेर.
विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूची
चोरटी वाहतूक करणारा दोन लाख रुपये
किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा चार
चाकी छोटा हत्ती टेम्पो ( क्रमांक एम एच
१६ सी सी ६२९१ ) आतील पाच हजार
रुपये किमतीच्या १ ब्रास वाळूसह पारनेर
पोलिसांनी सापळा रचून पकडला. ही कारवाई
पारनेर तालुक्यातील खडकवाडी ते कामतवाडी
कडे जाणाऱ्या रोडवर खडकवाडी शिवारात
येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पोलीस
कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून टेम्पो चालक भाऊसाहेब मनोहर
हारदे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा
कलम ३७९ अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद
केली असून अधिक तपास पोलिस नाईक
साळवे करीत आहे.