नेवासा( प्रतिनिधी .)नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू, वीटभट्ट्या, खडी क्रेशर व इतर महसूल काम काज नावापुरती कारवाई करून चालू आहे काही दिवसापूर्वी तहसीलदार सुराणा यांनी वाळूच्या बोटी फोडल्या चा बनाव केला ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी कारवाई केली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूच्या बोटी चालू होते हे त्यांना कळत नव्हतं का? ग्रामस्थांना थेट निवेदन देण्याची वेळ आली या बोटी नसून चपु होते चपू फोडून बोटींचा बनाव केल्याची चर्चा नेवासा तालुक्यात आहे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडविले असे म्हणणे नेवासा बुद्रुक येथील रहिवासी माऊली तोडमल यांनी म्हटले आहे वेळोवेळी अर्ज करून सुद्धा धामोरी येथील अवैध वीटभट्टी चालक विजय कोलते यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याचा आरोप केला आहे नेवासा तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वीटभट्ट्या शासकीय कोणत्याही परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणात तहसीलदार साहेब सर्कल तलाठी यांच्या आर्थिक तडजोडी करून मोठ्या प्रमाणात चालू आहे या वीटभट्टीयांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे माऊली तोडमल यांनी तहसीलदार साहेब यांना कागदोपत्री व प्रत्यक्ष 2019 सालापासून लक्षात आणून देऊन सुद्धा तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आहे जर तहसीलदार साहेबांनी या वीटभट्टी चालकाच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई केली नाही तर शिवसेना ,राजपूत करणी सेना, तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या विरोधात रास्ता रोको करून तहसीलदार साहेब यांना त्यांच्या पदाची जाणीव करून देईल असा इशारा माऊली तोडमल यांनी दिला आहे.