नेवासा (प्रतिनिधी.)
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह तरूणाला स्थानिक
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली . शरीफ उर्फ गोट्या
अकबर पठाण (वय ३० रा . नेवासा बस स्थानकाच्या पाठीमागे,
ता . नेवासा) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
त्याच्याकडून ३० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा , ६००
रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा ३० हजार ६०० रूपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . पोलीस नाईक संदीप संजय
दरंदले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या
फिर्यादीवरून आरोपी पठाण विरोधात भारतीय हत्यार
कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास
एमआयडीसी पोलीस करीत आहेत . पोलीस निरीक्षक कटके
यांना गोपनिय माहिती मिळाली की , शेंडी (ता. नगर) गावातील
बाह्यवळण रस्त्यावर एक मध्यम बांध्याचा मुलगा लाल शर्ट घालून
गावठी कट्टा व काडतुसे जवळ बाळगून फिरत आहे . कटके यांनी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या . त्याप्रमाणे
पथकाने औरंगाबाद रोडवरी अहमदनगर शेंडी येथे सापळा लावून
थांबले असताना , मिळालेल्या माहितीप्रमाणे शेंडी बाह्यवळण
रस्ता ते डेअरी चौक एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याने एक
व्यक्ती पायी जात असताना दिसला . पथकाला तोच व्यक्ती हाच
असल्याची खात्री होताच , पथकाने त्याला घेराव घालून ताब्यात
घेतले . त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात
गावठी कट्टा व काडतुसे मिळून आला. सहाय्यक पोलीस