माळीचींचोरा सज्ज! १२ ते १६ फेब्रुवारीला भव्य महाशिवरात्र महोत्सव—रामायण कथेसह पंचक्रोशीला भक्तीचा महासागर!
नेवासा : मौजे माळीचींचोरा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे यंदा वर्ष ०१ ले निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांसाठी भव्य महाशिवरात्र महोत्सव आणि भव्य-दिव्य अविस्मरणीय रामायण कथा यांचे जोरदार आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. १२/०२/२०२६ ते सोमवार दि. १६/०२/२०२६ या पाच दिवसांत गावात भक्तीचा प्रचंड जल्लोष होणार आहे. या महोत्सवामुळे माळीचींचोरा परिसरात पूर्णपणे शिवमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
या महोत्सवात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रामायण कथेचे आयोजन करण्यात आले असून, ह.भ.प. बबन महाराज पाटेकर (गेवराईकर) हे कथा प्रवक्ते म्हणून कथावाचन करणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांसाठी ही कथा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, श्रद्धा, संस्कार आणि भक्तीची मोठी पर्वणी ठरणार आहे.
महोत्सवात दररोज अन्नदान व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, दिनांक 12 ते 16 पर्यंत सायंकाळी पंगतीसाठी श्री. प्रकाश प्रसराम चिंधे, श्री. बाबासाहेब सतरकर, श्री. सागर पुंड, श्री. भाऊसाहेब पुंड, श्री. संदीप नारळे, श्री. लहु सोनवणे (दाजी) हे भाविक वृंद पुढाकार घेत आहेत. तसेच रात्री ९ ते १०:३० या वेळेत महाप्रसादासाठी श्री. ज्ञानदेव चांगदेव चिंधे, श्री. अशोक साहेबराव गुजर, श्री. हरिभाऊ आरगडे (सर), श्री. रविंद्र चिंधे (ग्रा.सदस्य), श्री. संजय चिंधे, श्री. अनिलभाऊ गायकवाड, श्री. दिलीप वाघ यांच्यासह श्री. बापु चव्हाण (दाजी) यांचे योगदान राहणार आहे.
या महोत्सवाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, श्री. प्रताप चिंधे (भाजप तालुका अध्यक्ष), श्री. बाळासाहेब बाबुराव चिंधे (डेपुटी), श्री. नितीन आहिरे (कामगार तलाठी), श्री. प्रकाश गुलाब वाघमारे (डेपुटी), श्री. किशोरभाऊ जोजार (उपसभापती नेवासा) हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. गावात होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे माळीचींचोरा परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, प्रशासन व आयोजकांकडून आवश्यक तयारीही सुरू आहे.
महाशिवरात्री निमित्ताने विशेष कार्यक्रम म्हणून सकाळी ९ वाजता खिचडी महाप्रसाद ठेवण्यात आला असून, सांगता निमित्ताने रात्री ९ वाजता आमटी-भाकरी महाप्रसाद होणार आहे. यासोबतच शिवलीलामृत अध्याय वाचन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असून, यामध्ये ह.भ.प. गोरख जगन्नाथ चिंधे, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज गायकवाड व इतर सहकारी सहभागी होणार आहेत.पंचक्रोशीतील भाविकांनी या भव्य महाशिवरात्र महोत्सव व रामायण कथेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवभक्तीचा अनुभव घ्यावा, असे जोरदार आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.