नेवासा फाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रमाई जयंती जल्लोषात! भीमसैनिकांचा प्रचंड जनसागर


🔥 नेवासा फाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रमाई जयंती जल्लोषात! भीमसैनिकांचा प्रचंड जनसागर

नेवासा फाटा प्रतिनिधी – नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रमाई जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात जयभीमचा गजर, घोषणाबाजी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिसून आला.
या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रमाईंच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे योगदान आणि समाजजागृतीतील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी रमाई जयंतीच्या शुभेच्छा देत सांगितले की, रमाईंचे विचार म्हणजे स्वाभिमान, त्याग आणि समाजाला जागं ठेवणारी प्रेरणा आहे.
यावेळी सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत रमाईंच्या विचारांची आजच्या समाजाला नितांत गरज असल्याचे ठामपणे सांगितले. “रमाईंच्या प्रेरणेतूनच बहुजन समाज उभा राहिला आहे. हा इतिहास विसरून चालणार नाही!” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगत समाज एकत्र ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन केले. तसेच संत गाडगे महाराज आश्रम, भानसहिवरे येथील मुख्याध्यापक श्री. कांबळे सर यांनी माता रमाई यांच्या जिवनचरित्र्याची माहिती सांगून माता रमाई यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यासाठी व आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी गवऱ्या व सरपण विकून संसार केला याची माहिती दिली. तसेच मुकिंदपुर चे पोलीस पाटील आदेश साठे यांनी त्यागमूर्ती रमाई यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत दुःख पचऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाची साथ दिली, ज्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजपरिवर्तन घडवले. याप्रसंगी मुकिंदपुरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री. सतिश दादा निपूंगे, मुकिंदपुर चे पोलीस पाटील आदेश साठे,मुकिंदपुर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब केदारे, मुख्याध्यापक कांबळे सर, भास्करमामा लिहिणार, पत्रकार आबासाहेब शिरसाठ, भिम शक्ती चे पप्पुभाऊ कांबळे, मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे, मक्तापूर सरपंच अनिल लहारे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब सोनवणे, संतोष साळवे, खरात साहेब,रभाजी इंगळे

या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक,  आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भीमसैनिकांनी रमाईंच्या कार्याचा गौरव करत समाज संघटित ठेवण्याचा संकल्प केला. रमाई जयंतीचा हा कार्यक्रम शांततेत, उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.