पिचडगाव येथील महिलांच्या आधुनिक जीवनाला दिशा देणारे सावित्रीबाई फुले यांचे कार्य – पोपटराव हजारे


महिलांच्या आधुनिक जीवनाला दिशा देणारे सावित्रीबाई फुले यांचे कार्य – पोपटराव हजारे

नेवासा प्रतिनिधी 
पिचडगाव येथील सुदर्शन विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्याध्यापक शकूर इनामदार सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी सरपंच श्री. पोपटराव हजारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांचे कार्य हे आजच्या आधुनिक काळातील महिलांसाठी अत्यंत मार्गदर्शक असून शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेचा मार्ग त्यांनी दाखवला. महिलांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात तरवडी येथील वृक्षमित्र श्री. शंकरराव कन्हेरकर, कु. साक्षी शिंदे, कु. आकांक्षा साळवे, कु. रेणुका शिरसाठ, कु. कल्याणी हजारे व कु. अमृता साबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी श्रीकांत बनसोडे, मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय कोळेकर, सौ. रमाताई साळवे, सौ. कल्पना गायकवाड, शिक्षक कैलास करजुले, हनुमान गौधारे, मनीषा जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी साळवे यांनी केले, तर आभार शिक्षक गणेश कचरे यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.