प्रभाग २६ मध्ये नितीन पटेकर यांचा आक्रमक निर्धार – ही उमेदवारी नाही, जनतेच्या हक्कांची लढाई!


प्रभाग २६ मध्ये नितीन पटेकर यांचा आक्रमक निर्धार – ही उमेदवारी नाही, जनतेच्या हक्कांची लढाई!

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ (अनुसूचित जाती प्रवर्ग) मधून नितीन पटेकर यांनी उमेदवारी जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. “ही केवळ निवडणूक लढवण्यासाठीची उमेदवारी नसून, जनसामान्यांच्या प्रश्नांची थेट जबाबदारी आहे,” असा ठाम आणि आक्रमक निर्धार नितीन पटेकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रभागातील युवकांना भेडसावणारा रोजगाराचा प्रश्न, उच्चशिक्षित तरुणांसाठी संधींचा अभाव, युवकांसाठी उद्योग व स्वयंरोजगाराचे अपुरे पर्याय – या सर्व मुद्द्यांवर ठोस आणि परिणामकारक काम करण्याचा अजेंडा त्यांनी मांडला आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, त्यांच्या सुविधा व सुरक्षितता यांना प्राधान्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांवर भर देत, उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार, तरुण खेळाडूंसाठी सुसज्ज क्रीडांगणे, तसेच झोपडपट्टी पुनर्वसनातून सन्मानाने जगता येईल असे पक्के घर – हेच आपल्या स्वप्नातील प्रभागाचे चित्र असल्याचे नितीन पटेकर यांनी स्पष्ट केले.
“प्रभाग २६ आता दुर्लक्षित राहणार नाही. आश्वासनांचे राजकारण संपवून विकास, हक्क आणि सन्मानाचे राजकारण इथे उभे राहील,” असा स्पष्ट इशारा देत नितीन पटेकर यांनी जनतेच्या पाठबळावर परिवर्तन घडवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
यामुळे येत्या निवडणुकीत प्रभाग २६ मध्ये नव्या नेतृत्वाची आणि ठोस कामगिरीची जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.