पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेताच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी खेळाडूंना दिलेल्या पाठबळाबद्दल टोका-प्रवरासंगम येथील जय मल्हार मित्र मंडळ व श्री सिध्देश्वर बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने त्यांचा श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले,तहसीलदार डॉ.संजय बिरादार,गटविकास अधिकारी संजय लखवाल,सिद्धेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे,मार्केट कमिटीचे नंदकुमार पाटील उपस्थित होते.सिद्धेश्वर बहु उद्देशीय संस्थेचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी आभार मानले