*भाजपा नेवासा शहर मंडलाची संघटनात्मक बैठक संपन्न*
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी नेवासा शहर मंडलाची संघटनात्मक बैठक नेवासा शहरातील प्रणाम हॉल येथे पार पडली यावेळी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुजन करुन अभिवादन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव निरंजन डहाळे होते तर भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, महिला मोर्चा प्रदेश सचिव अमृता नळकांडे, जेष्ठ नेते संजीव शिंदे व राजेंद्र मुथा व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे म्हणाले की आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय इच्छुक कार्यकर्त्यांनी प्रभागातील समस्यांवर लक्ष ठेवून जनसंपर्क वाढविण्यासाठी काम करावे तसेच शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याची सुचना केली यानंतर सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्र घेण्यात आले यामध्ये विलास बोरुडे, राजेश कडु, राजेंद्र मुथा, संदिप पारखे, निवृत्ती बर्डे,भाजप महिला आघाडी प्रदेश सचिव सौ.अमृता नळकांडे यांनी प्रभागातील प्रश्न व कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या अध्यक्षिय भाषणात बोलताना भाजपा प्रदेश सचिव निरंजन डहाळे यांनी डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवनप्रवास व कार्याची माहिती दिली व आगामी येणाऱ्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता व नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या या बैठकीस अनंता डहाळे, निखिल जोशी, संतोष चांदणे, प्रसाद लोखंडे, गोपीनाथ माकोणे, रितेश कराळे महेश पारखे, भरत पारधी, आकाश कुसळकर, प्रकाश गरुटे, गणेश सोनवणे, दत्ता लष्करे, रामदास लष्करे, किरण भोसे, तुषार कारंडे, शिवाजी लष्करे, महेश भुसारे, विजय मोरे, अनिल आगळे, निवृत्ती बर्डे मनोज डहाळे, अशोक मारकळी, रोहित पंडुरे, अभिषेक शेजुळ, गोविंद कदम शंकर कोरेकर आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.