टाकळीभान तालुका श्रीरामपूर येथे भारतीय ग्राहक महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी गायकवाड यांचे अधक्षतेखाली बैठक संपन्न
नेवासा ( प्रतिनिधी.)भारतीय मानक ब्युरो तर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण दिल्ली येथे संपन्न झाले.त्या प्रशिक्षणामध्ये रमेशजी गायकवाड कर्णासाहेब तुवर आणि अँड सुदाम ठुबे यांची निवड करण्यात आली होती.सी सो आय चे राष्ट्रीय महासचिव विख्यात सेनाई साहेब यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर भारतीय ग्राहक महासंघाच्या बैठकीला वेग आला भारतीय ग्राहक महासंघ म्हणजे (सी सी आय )अनेक सामाजिक कामात नावाजलेली आहे.मोबाईल चार्जर “टाईप सी “ पिन ही एकाच प्रकारची असावी म्हणून लढा देऊन त्याला यश मिळवून देणारी सी सी आय ही ग्राहकांचे हक्कांसाठी लढते.ग्राहक मग तो कोणत्याही दुकानदारचा असो अथवा बँकेचा अथवा जिथे ग्राहक हा शब्द लागू होतो त्याचे हक्कासाठी लढत असते .आय एस आय नोंदणीकृत जसे उत्पादने असतात तसेच (BIS)भारतीय मानक ब्युरो यांचेकडे देखील नोंदणीकृत बाराशे उत्पादने आहेत.त्या उत्पादनामधे जनजागृती अजून समाजात कमी आहे.जसे की सोन्याचे दागिन्यावर हॉलमार्क (BIS) रजिस्टर असते त्यामध्ये जास्तीत जास्त २४ कॅरेट म्हणून १८ कॅरेट सोन्याचा दागिना दागिन्यांमध्ये विकून यामध्ये फसवणूक होऊ शकते झालेली आहे.त्या फसवणूक झालेल्या ग्राहकाला त्याची नुकसान भरपाई देखील मागण्याचा अधिकार आहे.एखादे उत्पादन विकणारा फसवणूक करत असेल तर राष्ट्रीय स्तरावर 1915 हा हेल्पलाईन क्रमांक देखील जाहीर केला आहे.वीस दिवसात तक्रारीचे निराकरण करून ग्राहकास न्याय दिला जातो. भारतीय ग्राहक महासंघाचे बैठकीमध्ये नेवासा फाटा येथील पोलिस पाटील आदेश साठे श्रीरामपूर येथील सी सी आय तालुका अध्यक्ष राजेंद्र कोकणे राहुरी तालुका अध्यक्ष सुजित पवार नेवासा तालुका उपाध्यक्ष कर्णासाहेब तुवर राजेंद्र देवळक,सी सी आय प्रतिनिधी जयकर मगर,आपासाहेब चौधरी,शंकर हिवाळे,विशाल पठारे, युवराज चक्रनारायण,अरुण चक्रनारायण आदींनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला.सी सी आय राज्य अध्यक्ष रमेश गायकवाड व अँड सुदाम ठुबे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.