तरवडी (नेवासा) येथे संत गोरोबा काका, विठ्ठल-रुक्मिणी व मुंजोबा देवतांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्साहात सांगता


तरवडी (नेवासा) येथे संत गोरोबा काका, विठ्ठल-रुक्मिणी व मुंजोबा देवतांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्साहात सांगता

तरवडी, ता. नेवासा – नेवासा तालुक्यातील तरवडी या गावामध्ये दिनांक ८ जून २०२५ रोजी संत गोरोबा काका, विठ्ठल-रुक्मिणी आणि मुंजोबा या देवतांच्या नव्याने स्थापिलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि कलशपूजन सोहळा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे आयोजन कुंभार समाज बांधव आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठा विधी व कलश पूजन हा.भ.प. गोपाल गिरीजी महाराज (मुकाई देवस्थान, उस्थळ दुमाला) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या सोहळ्याचे उद्घाटन व शुभारंभ हा.भ.प. मा.आ. पांडुरंग अभंग साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमावेळी गावातील ह.भ.प. रामनाथ महाराज राजगुरू, जनार्धन भालेराव देवा, ह.भ.प. ऋतुजा ताई इंगळे, ह.भ.प. स्वराली ताई भालेराव यांनीही उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

कुंभार संघटनेचे श्री. विनायक रावजी राऊत, डॉ. भाऊसाहेब आवंडकर, राजाभाऊ बोरुडे, ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे सर, कचरू बोरुडे यांचीही उपस्थिती कार्यक्रमास लाभली.

याशिवाय गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व माननीय सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, तसेच संपूर्ण ग्रामस्थ आणि परिसरातील महाशिकारे, थोरात, इंगळे व इतर कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेषतः शिवाजीराव महाशिकारे यांच्या प्रेरणेतून महाशिकारे परिवाराचे सक्रिय योगदान उल्लेखनीय ठरले.

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ नेवासा तालुक्याचे अध्यक्ष श्री. योगेश राऊत हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

या अध्यात्मिक सोहळ्यामुळे गावामध्ये धार्मिक आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला असून, ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.


---

[

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.