*_आदर्श शाळेतील शिक्षकांना लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे पुरस्कार प्रदान._*


*_आदर्श शाळेतील शिक्षकांना लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे पुरस्कार प्रदान._*

खरवंडी :- लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात येणारे विविध प्रकारच्या पुरस्काराचे वितरण वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज एक दिवसीय साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे हस्ते व उद्घाटक हे भ प बाबा महाराज ससाणे, स्वागताध्यक्ष कवी राजेंद्र फंड, श्री सुभाष त्रिभुवन व संयोजक बाबासाहेब पवार आणि कवी सुरेश वैरागर यांचे उपस्थितीत. मान्यवरांच्या समवेत वितरीत करण्यात आले. 
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. साहित्यातून समाजाला प्रेरक विचार मिळतात तर संताकडून समाजाला योग्य विचार व दिशा दिली जाते. म्हणून लोककला कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने प्रथमच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करून नवागत कलाकारांना, कवींना, साहित्यिकांना प्रेरणा मिळावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच सुसंस्कार मिळावेत यासाठी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविण्यात व सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असणा-या नेवासा तालुक्यातील सोनई येथील श्री अशोक दराडे सर व भाऊसाहेब खेसमाळसकर सर यांना राज्यस्तरीय संतश्रेष्ठ पुरस्कार तर श्री चांगदेव दरंरले सर व ज्ञानदेव फोपसे सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संतांच्या विचारांची शालेय विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच सुसंस्कारासाठी मोठी गरज असल्याचे मत श्री अशोक दराडे सर यांनी व्यक्त केले. शिक्षक समाजाला घडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा घटक आहे असे विचार सन्मानार्थ्यांनी व्यक्त केले. अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.