: "स्व. रघुनाथ भदगले व वच्छलाबाई भदगले यांच्या पुण्यस्मृतींना आज प्रथम वर्षश्राद्ध विनम्र श्रद्धांजली उस्थळ दुमाला येथे
स्वर्गीय कै. रघुनाथ भागुजी भदगले व कै. वच्छलाबाई रघुनाथ भदगले यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आज दिनांक २९ मार्च २०२५ रोजी त्यांच्या पुण्यस्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यांची सामाजिक तसेच कौटुंबिक कार्य मानवी जीवनात आज सुद्धा अनेक आठवणींना त्यांच्या आप्तेष्टांकडून नेहमी त्यांची आठवण होऊन केली जात
"मनी होता भोळेपणा, कधी न दाखविला मोठेपणा,
चेहरा तो सदा हसतमुख,
सर्वांना दिला आनंद खूप...
होतो भास तुम्ही आहात जवळपास..."
यावेळी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. भागवताचार्य गणेश महाराज वारंगे मादळमोहीकर (बीड) यांचे कीर्तन होणार आहे. महाराज आपल्या प्रवचनातून स्व. रघुनाथ भदगले यांच्या साधेपणा, मृदू स्वभाव आणि समाजहितार्थ केलेल्या कार्याची आठवण करून देतील.
स्व. रघुनाथ भदगले वच्छल रघुनाथ भदगले यांचे सुपुत्र श्री. त्रिंबक भदगले यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करत त्यांचे हित जपले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले असून त्यांनी शेतकरी संघटनेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग नातेवाईक परिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे
या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व नागरिकांना विनम्र निमंत्रण.- समस्त भदगले परिवार तर्फे देण्यात आले आहे