कुंभमेळा भरण्यापूर्वीच वादाचा मेळा नाशिकात सुरू झालाय.


Published by:Last Updated:March 28, 2025 9:51 PM ISTNashik Kumbh Mela: कुंभमेळा भरण्यापूर्वीच वादाचा मेळा नाशकात सुरू झालाय. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभला त्र्यंबकेश्वर कुंभ असं नाव देण्याची मागणी त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांनी केली होती.नाशिक कुंभ मेळानाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला नाव देण्यावरून साधू महंतांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झालेत. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी नवा वाद निर्माण झालाय. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त हेच शाही स्नानाचं मूळ स्थान असल्याचा दावा त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या अध्यक्षांनी केलाय. त्यांच्या दाव्यानं नाशिकच्या रामकुंड तपोवनात होणाऱ्या कुंभमेळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमका काय आहे हा वाद? वाचा...कुंभमेळा भरण्यापूर्वीच वादाचा मेळा नाशकात सुरू झालाय. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभला त्र्यंबकेश्वर कुंभ असं नाव देण्याची मागणी त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांनी केली होती. त्या मागणीला नाशिकमधील साधू महंतांनी विरोध केलाय.अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी शाही स्नानाचं मुख्य स्थान कुशावर्त असल्याचा दावा केलाय. इतकंच नाही तर 13 पैकी 10 आखाडे हे एकट्या त्र्यंबकेश्वरमध्ये असून अमृताचा थेंब देखील कुशावर्तातच पडल्याचा दावाही शैव पंथीय आखाड्याच्या प्रमुखांनी केलाय.advertisementत्र्यंबकेश्वरमधील शैव पंथीय साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच नाशिकच्या पंचवटी तपोवनातील वैष्णव पंथीय आखाड्यांच्या प्रमुखांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. प्रशासकीय नोंदीप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्ये वैष्णव साधू-महंत पंचवटीमध्ये स्नान करतील. त्यामुळे सर्व 13 आखाड्यांच्या प्रमुखांनी तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात येतंय.वादामुळे त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त कुंड पुन्हा एकदा सर्व दावे-प्रतिदाव्यांचं केंद्र बनलंय. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून काही मीटर अंतरावर असलेलं कुशावर्त अगदी छोटं असल्याने या कुंडात कोट्यवधी भाविकांचं स्नान कसं होणार, हे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालंय.advertisementनाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्या पूर्वीच कुंभमेळ्याचे मूळ स्थान कोणतं? नाशिकला काय नाव द्यायचं? असा पेच निर्माण झालाय. परिणामी या वादावर काय तोडगा निघतो, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.