*नेवासा: दक्ष पत्रकार असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी नरेंद्र पाटील काळे यांची निवड*
*नेवासा* – दक्ष पत्रकार असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी नरेंद्र पाटील काळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मोईन यांनी केली.
संघटनेच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सक्षम नेतृत्व मिळावे, या उद्देशाने ही निवड करण्यात आली.
नरेंद्र पाटील काळे यांनी संघटनेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रभावी लढा उभारण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांनी अभिनंदन केलेच सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी भ्रमण दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले लवकरच कार्यक्रम घेतला जाईल असे त्यांनी सांगितले निवडीचा असे आमच्या सूत्राकडून समजले.