नागेबाबा मल्टिस्टेटच्या मयत सभासद यांच्या वारसास दहा लाख रूपयांचा धनादेश प्रदान
नेवासा: श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था केवळ आर्थिक सेवा देणारी संस्था नसून, सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करत असून, खास करून सभासदांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलत आहे.
नागेबाबा मल्टिस्टेटने 'सभासद सुरक्षा कवच योजना' सुरू केली आहे, ज्याअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय अपघात झाल्यास ५ लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देखील संस्था पुरवते.
अलीकडील घटनेत, श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट नेवासा शाखेचे खातेदार सभासद के. सौरभ शरद काळे यांचे अपघाती निधन झाले. त्यांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत मदतीचा लाभ मिळालेला आहे. त्यांच्या वारसांना आज, ५ डिसेंबर २०२४ रोजी, दहा लाख रुपयांचा धनादेश नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीने सुपूर्त करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये भानसहिवरा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच किशोर जोजर, ह. भ. प. अविराज महाराज, अशोक शेठ बोरा, बाळासाहेब भनगे, जाधव वकील साहेब, कचरू शेठ भणगे, देविदास साळुंके, कालिका फर्निचरचे अरुण रासने, कोकाटे साहेब, भाऊसाहेब फुलारी, रमेश नळकांडे, बाळासाहेब पेहरे, भाऊसाहेब बनकर, संदीप फुलारी सर, रमेश गुणवंत, बाबासाहेब ढवाण, डॉक्टर सोनवणे साहेब, रावसाहेब थेडगे, भाऊसाहेब पंडित आणि इतर ग्रामस्थ व नागेबाबा परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या योजनेमुळे, संस्थेने अपघाती घटनांमध्ये पीडित कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे.