*मौजे बेलपिंपळगाव श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरुवार 5 डिसेंबर पासून सुरुवात*
नेवासा : संत संगती, ग्रंथ वाचन, ईश्वर सेवा यामुळे अंतःकरण पवित्र होते व मनुष्य व्यसन मुक्त होतो. परमार्थाने संसार उत्तम प्रकारे होऊ शकतो. परमार्थात मानव मित्रांची प्रीती वाढावी व वारकरी संप्रदायचे सात्विक विचार त्यांचा प्रसार व्हावा म्हणून वै. गु.ह. भ. प. बन्सी महाराज तांबे व वै. ह. भ. प. सेवानंद महाराज यांच्या आशीर्वादाने वै. ह. भ. प. रामभाऊ महाराज देवा व गुरुवर्य प. पु. ह. भ. प. भास्कर गिरी महाराज, श्री क्षेत्र देवगड यांच्या प्रेरनेणे व हरिभक्त पारायण संजय महाराज सरोदे व ह. भ. प. दत्तात्रय महाराज तरहळ बेलपिंपळगाव यांचे नेतृत्वाखाली मिती मार्गशिर्ष शु!! 12 शके 1946 गुरुवार दि. पाच डिसेम्बर ते बारा डिसेंबर 2024 पर्यंत संपन्न होणार आहे.
व्यासपीठ चालक ह. भ. प. केशव महाराज शिंदे, ह. भ. प. संजय महाराज सरोदे, ह. भ. प. दत्तात्रय महाराज तऱ्हाळ, ह.भ.प. उत्तम महाराज अंधारे. सदिच्छा भेट ह. भ. प. प्रकाशनंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड.गुरुवार रोजी पाच डिसेंबर रात्री सात ते नऊ या वेळेत श्री. ह. भ
प. लक्ष्मण महाराज नांगरे बहिरवाडी यांचे हरिकीर्तन होईल.