बातमी: माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे संकेत ज्ञानदेव बेल्हेकर यांच्या कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्तीला अभिनंदन
नेवासा (प्रतिनिधी )नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील ज्ञानदेव बेलेकर यांचे चिरंजीव संकेत ज्ञानदेव बेल्हेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत अहिल्यानगर येथील कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती झाली आहे. या महत्वपूर्ण उपलब्धीच्या सन्मान सोहळ्यात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपस्थित राहून संकेतचे मनस्वी अभिनंदन केले.
यावेळी मुरकुटे यांनी संकेतच्या मेहनत आणि समर्पणाचे कौतुक करत त्याला उज्ज्वल भविष्याची शुभेच्छा दिली. त्यांनी युवकांसाठी अशा प्रकारच्या कामगिरीचा आदर्श ठरवला असून, त्याच्या यशाने इतरांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
संकेतच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांनीही त्याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.